Crack Collapsed : सहकारनगरमध्ये दरड कोसळली;ढिगाऱ्याखाली चार दुचाकी अडकल्या

सहकारनगर क्रमांक दोन येथे एका सोसायटीच्या आवारात दरड कोसळून त्या खाली चार दुचाकी अडकल्याची घटना आज (ता. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
Crack Collapsed
Crack Collapsedsakal
Updated on

पुणे : सहकारनगर क्रमांक दोन येथे एका सोसायटीच्या आवारात दरड कोसळून त्या खाली चार दुचाकी अडकल्याची घटना आज (ता. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयासह बांधकाम विभागाने दरडीचा धोकादायक भाग काढून घेण्यास सुरुवात केली आहे. यात कोणालाही इजा झालेली नाही.

सोसायटीच्या या भागात रोज सायंकाळी मुलं खेळत असतात, पण आज तेथे कोणीही नसताना दरड कोसळल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी या डोंगरामध्ये झिरपल्याने खडक मोकळा होऊन दरड कोसळल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम, माजी नगरसेवक महेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

साहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम म्हणाले, ‘‘जेसीबीने राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. बांधकाम विभागाकडूनही पोकलेन पाठवून धोकादायक भाग काढून घेतला जाणार आहे.’’रहिवासी दीपा तुपे म्हणाल्या, ‘‘मोठा पाऊस झाल्याने ही दरड पडली असावी, या ठिकाणी मोठा डोंगर आहे. त्यामुळे पुढे दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेने उपाययोजना करावी.’’‘‘हा डोंगर सोसायट्यांना लागून आहे, त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड काढण्यासाठी वन विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे,’’ अशी मागणी महेश वाबळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.