Onion Thief: कांदा झाला सोन्याचा! शेतकऱ्याचा डोळा चुकवून चोरट्यांनी मारला डल्ला, मध्यरात्री अज्ञात ड्रोनच्या घिरट्या वाढल्या

जारकरवाडी ता. आंबेगाव : येथील बढेकर मळ्यात बाळासाहेब बढेकर यांच्या कांद्याच्या बराकीची लोखंडी जाळी कापून भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 50 पिशवी कांदा चोरून नेल्यामुळे त्यांचा सुमारे ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले
onion burglary thief
onion burglary thiefesakal
Updated on

पारगाव ता. 15 : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मागील महिनाभरापासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या वाढल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली असताना काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. आज सोमवारी पहाटे जारकरवाडी येथील बढेकर मळ्यात बाळासाहेब लालजी बढेकर या शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराकीची लोखंडी जाळी कापून भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 50 पिशवी कांदा चोरून नेल्यामुळे त्यांचा सुमारे ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

onion burglary thief
-कांदा खरेदीसाठी पावस बाजारात गर्दी

जारकरवाडी येथील बढेकर मळ्यातील बाळासाहेब बढेकर यांची डिंभे उजव्या कालव्या लगत असलेल्या शेतातील बराखीत सुमारे सातशे पिशवी कांदा साठवणूक करून ठेवला आहे. आज सोमवारी सकाळी ते बराखी कडे पाहणी करण्यासाठी गेले असता बराखीची लोखंडी जाळी कापून भगदाड पाडुन अज्ञात चोरट्यांनी भगदाड पाडून सुमारे 50 पिशवी भरेल एवढा कांदा टेम्पो सारख्या वाहनात भरून नेला आहे.

सध्या बाजारात कांद्याला प्रति 10 किलोला 280 ते 300 रुपये बाजारभाव मिळत असल्याने कांद्याचे चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारून बढेकर यांच्या बराकितुन सुमारे 50 पिशवी कांदा चोरून नेल्याने सुमारे 85 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बढेकर यांनी पारगाव कारखाना पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.