Pune Crime : पुण्यातील राजुरी येथे चोरटयांनी ३ घरे फोडली; वृध्द महिलेस मारहाण, दागिने व रोख रक्कम लंपास

चोरटयांनी तीन घरे फोडुन‌ एका घरातील वृध्द महिलेस काठीने ने मारहाण करून तिचे अडीच तोळे दागिने व २८ हजार रुपयांची रोख रक्कम नेली चोरून
thieves robbery in 3 houses at Rajuri in Pune Elderly woman beaten jewels and cash crime police
thieves robbery in 3 houses at Rajuri in Pune Elderly woman beaten jewels and cash crime policeSakal
Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा : राजुरी येथे चोरटयांनी तीन घरे फोडुन‌ एका घरातील वृध्द महिलेस काठीने ने मारहाण करून तिचे अडीच तोळे दागिने व २८ हजार रुपयांची रोख रक्कम नेली चोरून याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील

उपळी मळ्यात रहात असलेल्या सुनंदा सदाशिव नायकवडी या वृध्द महिला एकट्या घरात रहात असुन बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरटयांनी घराचा दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश करत घरात असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडत असताना आवाज आल्याने झोपलेल्या सुनंदा नायकवडी यांणा जाग आली असता आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

चोरट्यांनी लगेच महिलेचे तोंड दाबत गळ्यात व कानात असलेले दागिने काढुन दे सांगितले परंतु सदर महिलेने दागिणे देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांना काठीने मारहान करत अंगातील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व कपाटात असलेले २८ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.

तसेच याच मळया शेजारील डोले मळ्यात रहात असलेले किसन डौले यांचा बंगला असुन ते काल कामा निमित्ताने बाहेर गावी गेल्याने बंगला बंद होता याचा फायदा चोरट्यांनी घेत बंगल्याचा दरवाजा तोडुन आतमध्ये असलेला एक लॅपटॉप चोरून नेला आहे .तर जवळच रहात असलेले संतोष कणसे यांच्याही बंद घराचा दरवाजा तोडुन कपाटात असलेले १८ हजार रूपयांची रोख रक्कम व नविन कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहे.

दरम्यान आणे गावातील दोनच दिवसांपुर्वी एका घरावर दरोडा पडुन घरातील माणसांना मारहाण करत साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ताजी असताना आज परत राजुरी या ठिकाणी चोरटयांनी चार घरे फोडुन एका वृध्द महिलेस मारहाण करत दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक आळेफाटा

सध्या आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील गावामंध्ये चो-यांचे प्रमाण वाढलेले असुन पोलीस बळ लक्षात घेता प्रत्येक गावातील तरूणांनी एकत्र येऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन गावागावात मळयांमध्ये रात्रीचा पहारा देण्यासाठी गस्ती घालाव्यात तसेच शक्यतो सर्वांणी सी.सी.कॅमेरे बसवावेत.तर दिवसा संशयीत व्यक्ती गावातुन फिरत असल्याचे दिसुन आल्यास पोलीस स्टेशन ला संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.