Crime News : बारामतीत चोरटयांनी मंगळसूत्र हिसकावले; पोलिस मात्र निवांतच

सुदैवाने त्यांना कोणती दुखापत झाली नाही
Crime News
Crime News esakal
Updated on

बारामती : शहरातील भिगवण रस्त्याच्या सेवा रस्त्यावर महानगर बँकेनजिक शनिवारी (ता. 22) सकाळी साडेआठ वाजता ज्येष्ठ महिलेचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरटयांनी हिसका मारुन चोरुन नेले.

Crime News
Nashik News : नांदगाव तालुक्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण, मात्र वरुणराजाने पाठ फिरविल्याने वाढली चिंता

सुमन कापरे व बबन कापरे हे ज्येष्ठ नागरिक दांपत्य नेहमीप्रमाणे सकाळी फिरुन शिक्षक सोसायटीतील आपल्या घरी निघाले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसका मारत मंगळसूत्र चोरुन नेले. अनपेक्षितपणे हिसका बसल्याने सुमन कापरे या खाली पडल्या, सुदैवाने त्यांना कोणती दुखापत झाली नाही मात्र या अचानक झालेल्या चोरीच्या प्रकाराने त्यांना मानसिक धक्का बसला.

पोलिसांची असंवेदनशीलता....

हा प्रकार घडल्यावर काही मिनिटातच कापरे कुटुंबियांनी शहर पोलिस ठाणे गाठले. तातडीने तपास केला असता तर नाकाबंदी करुन दुचाकीचा शोध घेणे शक्य झाले असते, मात्र त्यांचा अर्ज ठेवून घेण्याव्यतिरिक्त पोलिसांनी काहीच केले नाही. इतकेच नाही तर घटनास्थळावर एक पोलिस कर्मचारी येऊन पाहणी करुन निघून गेला. सीसीटीव्ही फूटेजबाबतही फिर्यादींनीच पोलिसांना मदत केली. वास्तविक अशी घटना घडल्यानंतर अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासह फिर्यादीशी संवाद साधणे गरजेचे होते, तातडीने तपास करायला हवा होता, प्रत्यक्षात अर्ज ठेवून घेण्यापलिकडे पोलिसांनी काहीही केले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोरील रस्त्यावर दिवसाउजेडी चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावल्यानंतरही पोलिसांनी तातडीने तपास तर दूरच साधी दखलही घेतली नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.