मूळचे उत्तर सोलापूरचे (North Solapur) असलेले सुनील भालेकर हे कुटुंब दापोडी-केडगाव परिसरात बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगची काम करत होते.
केडगाव : दापोडी (ता. दौंड) येथे विजेचा धक्का (Electric Shock) लागून एकाच कुटुंबातील तीन जणांचा आज सकाळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पती, पत्नी व त्यांच्या मुलगा या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. सुरेंद्र देवीदास भालेकर (वय ४५) आदिका सुनील भालेकर (वय ४०), परशुराम सुनील भालेकर (वय १७) तिघेही रा. दापोडी यांचा या घटनेत मृत्यू झाला.
सुनील भालेकर घरासमोर टाॅवेल वाळायला घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आदिका प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दोघांना वाचविण्यासाठी परशुरामने त्यांना ओढत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यांची एक मुलगी शिकवणीसाठी बाहेर गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.
मूळचे उत्तर सोलापूरचे (North Solapur) असलेले सुनील भालेकर हे कुटुंब दापोडी-केडगाव परिसरात बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगची काम करत होते. त्यांच्या घरात वीज पुरवठा केलेली वायर एका उभ्या असलेल्या पत्र्यावर टेकली होती. वा-याने हलून हलून या वायरचे वरील आवरण निघून गेले होते. तेथून वीज प्रवाह घरात उतरला होता. कपडे वाळायला घालायच्या तारेत वीज प्रवाह उतरला होता.
सुनील भालेकर हे अंघोळीनंतर टाॅवेल वाळायला घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. सुनील यांना एक मुलगी व दोन मुलगे आहेत. मुलगी शिकवणीच्या वर्गासाठी बाहेर गेली होती. तर, दुसरा मुलगा मूळ गावी आहे. घटनास्थळाला वीज कंपनीचे अधिकारी व पोलिस अधिका-यांनी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.