पदव्युत्तर पदवीच्या प्रोजेक्टला तीन महिन्यांची मुदतवाढ

student
studentsakal media
Updated on

पुणे ः व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी १० जून पर्यंत त्यांचे प्रोजेक्ट, डझर्टेशन सादर करावेत. मुदतीत जमा न केल्यास वर्ष वाया जाण्याची भीती होती. हा वेळ खूपच अपुरा असल्याने विद्यार्थ्यांनी व्यथा मांडल्यानंतर ही मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. मास्टर इन इंजिनिअरींगसह (एमई), एम फार्मसी, आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत महाविद्यालयांना प्रोजेक्ट सादर करता येणार आहेत.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक बिघडलेले असल्याने त्याचा परिणाम विद्यापीठाच्या परीक्षांसह विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टवर देखील झालेला आहे. विद्यीपाठाने २०२०-२१ ची आॅक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी प्रथम सत्र परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेतली आणि आता जून-जुलै महिन्यात द्वितीय सत्र परीक्षेचे नियोजन सुरू केले आहे. कोरोनामुळे महाविद्यालये, प्रयोगशाळा बंद असणे, गेल्या दोन महिन्यांपासून कंपन्यांमध्ये उपस्थितीवर मर्यादा आल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट, डझर्टेशन करण्यात अनेक अडचणी आलेल्या आहेत. प्रथम सत्राचे प्रोजेक्ट १५ दिवसांपूर्वी जमा केले आहेत. त्यानंतर द्वितीय सत्रातील प्रोजेक्ट १० जून पर्यंत जमा करा असे आदेश ‘एमई’च्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते. तसेच एम फार्मसी, आर्किटेक्चरच्या प्रोजेक्टची मुदत जून महिन्यातच संपत होती.

student
पुणे जिल्ह्यात लहान मुलांसाठी 8000 बेडस्

हे विद्यार्थी पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील असल्याने त्यांची शेवटच्या सत्राची परीक्षा लवकर घेऊन लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहे. पण जून महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण न केल्यास अंतिम निकालात त्याचे गुण दिसणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती होती. याबाबत तक्रारी आल्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय येत ३१ आॅगस्ट पर्यंत प्रोजेक्ट, डझर्टेशनला मुदतवाढ दिली आहे.

student
पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, डझर्टेशन पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे एमई, एमफार्मसी, आर्किटेक्चर या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दोन दिवसात याचे परिपत्रक जाहीर केले जाईल.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, पुणे विद्यापीठ

एमईच्या शेवटच्या सत्राचा प्रोजेक्ट लॉकडाऊनमुळे पूर्ण होऊ शकला नाही. प्रोजेक्टचा फायनल रिव्ह्यूव १० जून रोजी केला जाणार आहे. जर प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही तर पुढील सत्रात तो सादर करा असे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. विद्यापीठाने प्रोजेक्टसाठी मुदतवाढ दिली पाहिजे.

- शुभम निगडे, विद्यार्थी

student
पुणे विभागात उभारणार ऑक्सिजनचे १६ नवे प्लॅंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.