"आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी"

आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल
fadnvis
fadnvis
Updated on

पुणे : भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपला संपूर्ण राज्यभर मोकळा श्वास घेता येत असून त्यामुळे काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

fadnvis
"शुद्धीकरण' कोत्या मनाने होतं नसतं! बाळासाहेब सर्वांचे आहेत"

शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपत प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटत असल्याचं बुचके यांनी म्हटलं होतं. त्याचा धागा पकडून फडणवीस शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला.

fadnvis
Corona Update: राज्यात दिवसभरात 5,226 नवे रुग्ण

फडणवीस म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू. आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे.

fadnvis
राणेंनी दर्शन घेतल्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं शुद्धिकरण!

आशाताईंसोबत हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपत सन्मान केला जाईल. भाजपमध्ये आतला-बाहेरचा, जुना–नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो, असंही यावेळी फडणवीस म्हणाले. तर, आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपत त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

fadnvis
लसीकरण झालेल्या डॉक्टरांनाच कोरोना ते ट्विटरनं बदलली प्रायव्हसी पॉलिसी

दरम्यान, आशा बुचके म्हणाल्या, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटत आहे. पक्षाची कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक घरात कमळ पोहचविण्यासाठी काम करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.