Helicopter Crash In Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तीन जणांचा मृत्यू

Pune Helicopter Crash three People Died : पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Helicopter Crash
Pune Helicopter Crash
Updated on

पुण्यातील बावधनजवळ लव्हळे परिसरात हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलटसह एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी (ता. २) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पायलट जी. के. पिल्लई, परमजीत सिंग आणि अभियंता प्रीतम भारद्वाज अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ हेलिपॅडपासून दीड किलोमिटरच्या अंतरावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहने घटनास्थळी दाखल झाली तसेच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या.

Pune Helicopter Crash
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींची दिवाळी दणक्यात! अजित पवारांनी सांगितले कधी येणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे

लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले. त्यानंतर अवघ्या चार ते पाच मिनिटांत सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर अचानक कोसळले. हेलिकॉप्टरमधून दोन पायलट आणि एक अभियंता असे तिघेजण प्रवास करीत होते. हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळल्यानंतर आग लागली. हेलिकॉप्टरचे अनेक तुकडे होऊन ते विखुरले गेले होते. या भीषण अपघातात तिघांचा गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. सकाळी दाट धुके होते. तसेच, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Pune Helicopter Crash
Maharashtra Rain Update : राज्यात आज कुठे पाऊस बरसणार? हवामान विभागाचे ऑक्टोबर ते डिसेंबरमधील अंदाज जाहीर

हे हेलिकॉप्टर दिल्ली येथील हेरिटेज एव्हिएशन कंपनीच्या मालकीचे आहे. हे हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे यांना आणण्यासाठी जुहू येथे निघाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. याबाबत माहिती मिळताच पोलिस, तसेच पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आग आटोक्यात आणून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले.

महिन्याभरात हेलिकॉप्टर कोसळण्याची दुसरी घटना :

पुणे परिसरात हेलिकॉप्टर कोसळण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. मागील २४ ऑगस्ट रोजी जुहू, मुंबईवरून हैदराबादकडे निघालेले हेलिकॉप्टर पाऊस आणि खराब हवामानामुळे पौड परिसरात कोसळले होते. या अपघातात पायलट किरकोळ जखमी झाला होता. या अपघातात सुदैवाने चौघेही प्रवासी सुखरूप बचावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.