रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास बोपोडीतील आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या अंडरपासजवळ हा अपघात झाला होता.
पुणे : बेदरकारपणे मोटार चालवत पोलिस हवालदाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसोबत कारमध्ये असलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी एका वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) मद्यपान केल्याचे पुढे आले आहे.
मद्यपान करून घरी येत असताना सिध्दार्थ केंगार हा गाडी चालवत होता. त्याला एका कारने ओव्हरटेक केल्याने त्याला राग आला. यामुळे पुढे गेलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने स्वत:ची कार दामटण्याचा प्रयत्न केला आणि अपघात झाल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. अपघातात पोलिस हवालदार समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिस शिपाई (Police Constable) संजोग शिंदे हे जखमी झाले आहेत.
रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास बोपोडीतील आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या अंडरपासजवळ हा अपघात झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी केंगार याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्याची पार्टी करण्यासाठी सिद्धार्थ केंगार इतर तीन मित्रांसोबत स्विफ्ट कारमधून विश्रांतवाडी धानोरी येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे चौघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर कारमधून ते निघाले होते. सिद्धार्थ केंगार हा कार चालवत होता. खडकी परिसरात त्याच्या कारला एका कारने ओव्हरटेक केले. त्यामुळे त्याने लगेच रागाच्या भरात त्या कारला ओव्हरटेक करण्यासाठी पाठलाग सुरू केला. दारूच्या नशेत केंगारने जोरात कार पळवली. मात्र, त्यानंतरही त्याला काही केल्याने त्या कारला ओव्हरटेक होत नव्हती.
त्यामुळे त्याने अत्यंत बेदरकारपणे कार चालवली व त्यातूनच त्याने बोपोडीत त्या कारला ओव्हरटेक करताना गस्तीवरील हवालदार कोळी आणि पोलिस शिपाई शिंदे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी कारचा वेग एवढा होता की, पाठीमागे दुचाकीवर बसलेले कोळी उडून कारच्या काचेवर आदळून बोनेवटवरून खाली पडले. त्यामध्ये कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार घडल्यानंतर केंगार आणि गाडीतील त्याच्या तिघा साथीदारांनी तेथून वेगात पळ काढला. पोलिसांना घटनेचा सुगावा लागू नये म्हणून त्यांनी कार लपवून ठेवली होती. त्यानंतर चौघे आप-आपल्या घरी निघून गेले होते.
केंगार याला मंगळवारी (ता.९) खडकी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. वैद्यकीय तपासणीसाठी केंगार यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले यांनी न्यायालयास सांगितले. आरोपीच्या वतीने ॲड. डेसमंड फ्रान्सिस यांनी बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.