Pune : लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकासह तिघांना पोलिस कोठडी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपींना रविवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
Three people including assistant police inspector are in police custody for taking bribes crime pune
Three people including assistant police inspector are in police custody for taking bribes crime puneSakal
Updated on

पुणे : दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निगडी पोलिस चौकीतील एका सहायक पोलिस निरीक्षकासह तिघांना विशेष न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Three people including assistant police inspector are in police custody for taking bribes crime pune
Pune Crime : राजगडाच्या पायथ्याशी अढळला तरुणीचा मृतदेह; MPSC परीक्षेत राज्यात आली होती सहावी!

सहायक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस कर्मचारी सागर तुकाराम शेळके आणि मध्यस्थ सुदेश शिवाजी नवले (वय ४३, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी शनिवारी एका तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.

Three people including assistant police inspector are in police custody for taking bribes crime pune
Nashik Fraud Crime : कर्जाच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपींना रविवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी विशेष न्यायालयाने तिघांना येत्या २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.