राहू : बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाली. हि घटना वाळकी नजीक थोरात मळा (ता. दौंड) येथे (ता. 31) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पुणे
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. वाळकी, थोरात मळा, पिराचीवाडी परिसरात बिबटयाचाबेटपरिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचे वाढते हल्ले ही चिंताजनक बाब बनली आहे.
परिसरात बिबटयाने आतापर्यंत तीनशेंहून अधिक पाळीव प्राणीही फस्त केले आहेत. मात्र वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येकडे दुलर्क्ष करतात. बिबटयाला पकडण्यासंदर्भात चालढकल करतात. परिसरात तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी शिवराज दुध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अमोल दत्तात्रय थोरात, किशोर कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन चोरमले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरात मागील आठवड्यात कुत्र्यांचा फडशा पाडला. वाळकी-पिराचीवाडी-रांजणगाव रस्ता तसेच वाळकी-थोरात मळा रस्त्यावर बिबट्या आणि बिबट्याची मादी वावरताना दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी पाहिली होती. गेल्या आठवड्यात राहू-वाळकी रस्त्यावर वनविभागाच्या परिसरात बिबटया वावरताना. अनेकांना दिसला होता. तसेच जोंधळे नगर , वनविभागाच्या हद्दीत परिसरात एक मादी आणि दोन बछडे भरदिवसा फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करून देखील याकडे 'वनविभागाचे अधिकारी दुलर्क्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्ह्णने आहे.
परिसरात उसाची मोठ्या प्रमाणात तोडणी सुरू असल्यामुळे बिबटया, मादी व बछाडयांचा भरदिवसा अनेकदा दर्शन घडून येत आहे .परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक मोठया प्रमाणात भयभीत झाले आहेत. देवकरवाडी परिसरात तीन बिबट्यांना यापूर्वी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा. बिबटया दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तातडीने पिंजरा लावण्याची मागणी... वाळकी पिराचीवाडी थोरात मळा वाळकी संगमबेट परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा. तसेच नुकसान भरपाई मिळण्याची मागणी थोरात यांनी वन विभागाकडे केली हे. अशी मागणी अमोल थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाच्या अधिका-यांना पिंजरा लावण्यात टाळाटाळ केली. तर त्यांना रस्त्यावर आडवू असा इशारा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.