Pune Crime : उधार न दिल्याने तिघा तरुणांनी बिअर शॉपमधील कामगारास धारदार शस्त्राचा धाक दाखवत बिअर चोरून नेली

बिअर उधार न दिल्याने तिघा तरुणांनी बिअर शॉपमधील कामगारास धारदार शस्त्राचा धाक दाखवत बिअर चोरून नेली. हा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रस्त्यांवर घडला..
three youths threaten shop worker and stolen bear pune crime marathi
three youths threaten shop worker and stolen bear pune crime marathi Sakal
Updated on

विश्रांतवाडी : बिअर उधार न दिल्याने तिघा तरुणांनी बिअर शॉपमधील कामगारास धारदार शस्त्राचा धाक दाखवत बिअर चोरून नेली. हा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रस्त्यांवर घडला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास टिंगरेनगर, लेन नंबर ६ येथील निदमय बिअर शॉपी येथे फिर्यादी शुभम नंदकुमार अग्रवाल (रा. विद्यानगर, पुणे) काम करत होते.

बिअरशॉपीचे मालक दुकानात नसताना मालकाच्या ओळखीचे असलेले तिघेजण दुचाकीवरून आले. फिर्यादी यांना उधारीवर बिअरची मागणी करू लागले. फिर्यादी यांनी शॉपमध्ये मालक नसल्याने उधार बिअर देण्यास नकार दिला.

याचा राग आल्याने तिघांनी त्यांच्या हातातील धारदार हत्यार फिर्यादीच्या गळ्यावर लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली. तसेच बिअर शॉपमधील बीअरच्या कॅण्ड व बाटली जबरदस्तीने घेऊन गेले. आरोपी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यातील आरोपी,

स्वप्नील उर्फ सोप्या किसन भालेकर (वय 28 वर्षे, टिंगरेनगर, श्रमिक वसाहत, येरवडा) व प्रकाश शाम शिंदे (वय 26 वषे, भीमनगर, बीआरटी बसथांब्यामागे, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली असून एक आरोपी आकाश राजू सोनवणे (सर्वे नं. 46, भीमनगर, रा. विश्रांतवाडी) फरार आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शरद माळी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()