कष्टाने पिकविलेला शेतमाल रस्त्याच्या कडेला फेकून देण्याची वेळ

सध्या मिरचीला ४ रुपये दर मिळत असल्याने त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
Farmers
Farmerssakal
Updated on

वालचंदनगर : ढोबळी मिरची, टॉमेटो (tomato) व दोडक्याचे दर घसल्याने शेतकऱ्यांचा ( farmer) उत्पादन (production cost) खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे कष्टाने पिकविलेला शेतमाल रस्त्याच्या कडेला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर परीसरातील रामचंद्र दशरथ गायकवाड यांनी अडीच एकरामध्ये सिमला मिरचीची लागवड केली होती. चांगले पीक आणण्यासाठी त्यांनी सात लाख रुपयांचा खर्च केला. मात्र सध्या मिरचीला ४ रुपये दर मिळत असल्याने त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. पुणे, मुंबईला मिरची पाठविण्याचा खर्च जास्त होत असल्याने कष्टाने पिकवलेली मिरची त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून द्यावी लागत आहे.

Farmers
संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्ता झाला खड्डेमुक्त

याउलट परिस्थिती बाजारामध्ये असून रस्त्यावर भाजीपाला विकणारे व्यापारी ४० रुपये किलो दराने सिमला मिरची विकत आहेत तर आठवडे बाजारामध्ये २० ते २५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. टॉमेटोची अशीच अवस्था असून १०० रुपयांना २० ते २५ रुपये किलोचे कॅरेट व्यापारी खरेदी करत आहे. प्रतिकिलो टॉमेटोला ४ ते ५ रुपये दर मिळत आहे. औषधे व तोडणी खर्चही परवडत नसल्याचे भरणेवाडीचे शेतकरी भरत बोराटे यांनी सांगितले. टॉमेटोची किरकोळ विक्री २० ते २५ रुपये किलोने सुरू असून त्यात व्यापारी वर्गाचा फायदा होत असल्याचे चित्र आहे.

Farmers
पुणे-सोलापूर रस्त्यावर ‘एसटी’वर दगडफेक

दोन एकर क्षेत्रामध्ये दोडका आहे. काही दिवसांपासून दोडक्याला ४ ते ५ रुपये किलो दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. शासनाने शेतमालाला समाधानकारक दर मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत.

- लालासाहेब पवार, अध्यक्ष नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना.

Farmers
‘पीएमआरडीए’च्या हरकती मार्गी लावणार ; सुप्रिया सुळे

दोन टन ढोबळीचे मिळाले दोन हजार

निमगाव केतकीमधील अतुल भोंग व संजय भोंग यांना दहा दिवसांपूर्वी ढोबळी मिरची पुणे, मुंबई व मोशी मार्केटला पाठवली होती. दोन टन मिरचीचा वाहतूक खर्च व इतर खर्च वजा करून हातामध्ये दोन हजार रुपये राहिले. मिरचीला प्रतिकिलो एक रुपये दर मिळाला असून, शेती करायची कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.