ना पूर्ण पगार, ना नोकरीची हमी; अन् वरून राजीनामा देण्यासाठी दबाव!

IT_employee
IT_employee
Updated on

पुणे : ऑक्‍टोबरचा पूर्ण महिना मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे माझ्या सर्व सुट्या संपल्या. रुजू झालो तर काही कामच दिला नाही. याबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली तर लवकरच नवीन जबाबदारी देवू असे सांगितले गेले. मात्र त्यानंतर अचानक मला सांगण्यात आले की, तुमचे काम चांगले नाही. राजीनामा द्या. त्यामुळे कंपनीच्या दबावाला बळी पडून राजीनामा दिल्याची माहिती आयटी कर्मचारी साकेत यांनी दिली.

साकेत हे गेल्या तीन वर्षांपासून हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत कामाला होते. तीन महिन्यांची आगाऊ सूचना न मिळताच त्यांना नोकरीला मुकावे लागले. असेच प्रकार अजूनही अनेक आयटी कर्मचा-यांच्या बाबत सुरू आहे. त्यामुळेच अचानक कामावरून काढणे, पगार कमी केला, राजीमाना देण्यासाठी दबाव आणला, सुट्यांची कपात केली, पगारी सुटी दिली नाही, प्रसुतीसाठीची रजा विनापगारी केली तसेच इतर प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत, अशा प्रकारच्या 78 हजारहून अधिक तक्रारी शासनाकडे सादर केल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या या तक्रारींचा "नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट' (एनआयटीइएस) ही आयटीमधील कर्मचारी संघटना पाठपुरावा करीत आहे. या बाबत राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे दाद मागत जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

एप्रिलपासून राज्यभरातून आयटी कर्मचा-यांच्या विविध तक्रारी संघटनेकडे दाखल होत आहेत. कर्मचा-यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पुरावा करीत आहेत. कर्मचा-यांची पगार कपात करू नका किंवा त्यांना कामावरून काढू नका, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र तरीही पगार कपात किंवा कामावरून काढण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शासन यावर काही करीत का नाही?
- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, एनआयटीइएस

आयटी कर्मचा-यांसाठी बोर्ड स्थापन करण्याची मागणी :
राज्यात सध्या नऊ लाखांहून अधिक आयटी कर्मचारी आहेत. हे सर्व सध्या भयानक परिस्थितीतून जात आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांच्या कल्याणासाठी शासनाने स्वतंत्र बोर्ड स्थापन करावे. त्याद्वारे कामगाराचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशा विश्‍वास एनआयटीइएसने व्यक्त केला आहे.

आयटीएन्सने केलेल्या तक्रारी :
- अचानक कामावरून काढले
- पगार कपात केली
- सक्तीच्या रजेवर पाठवले
- सुट्यांचा पगार दिला नाही
- पगारी प्रसूती रजा नाकारली

या आहेत मागण्या :
- सर्व प्रकारच्या सुट्या आणि पगार नियमित करावा.
- कामावरून काढण्याची सूचना किमान तीन महिने आधी द्यावी.
- ओव्हरटाईमचा पगार द्यावा.
- कामगारांची सर्व प्रकारची पिळवणूक थांबवावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.