Pune Accident : धावत्या कंटेनरचा टायर फुटून कंटेनरला आग; कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

पंधरा दिवसांपुर्वी या ठिकाणी एक बारा चाकी गाडीने अचानक पेट घेतला
tire burst of running container causing huge fire burn auto spare parts in container pune alephata
tire burst of running container causing huge fire burn auto spare parts in container pune alephatasakal
Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा - या ठिकाणी धावत्या कंटेनरचा टायर फुटून लागलेल्या आगीत कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक पुण्याहुन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटल्याने चालक कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्सची राख झाली.

आळेफाटा येथील बायपास जवळ सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चाकण एमआयडिसी मधील ऑटो स्पेयर पार्ट्स कंपनीतून पार्ट भरून (एन.एल.१ ए.एच.१४४३ )

या क्रमाकांचा कंटेनर पुणे-नाशिक महामार्गाने नाशिककडे जात असताना आळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने चालकाने गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न करत असताना कंटेनरने अचानक पणे पेट घेतल्यामुळे चालक व वाहक यांनी बाहेर उड्या मारल्याने ते दोघेही सुखरूप बचावले,

मात्र मागील बाजूच्या टायरने आगीचा भडका घेतल्याने कंटेनर मध्ये असलेले लाखो रुपयांचे ऑटो स्पेअर पार्ट जळुन खाक झाले आहे सुदैवाने या ठिकाणी झालेल्या घटनेत जिवीत हानी झाली नाही.

घटनास्थळी घटना घडल्यानंतर तीन तासानंतर अग्नीशामक दलाची गाडी आल्यानंतर वडगाव आनंद गावचे उपसरपंच ऋषिकेश गडगे, स्वप्नील देवकर, दीपक शिंदे, साहिल गडगे, शुभम गडगे यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आळेफाटा हे पुणे- नाशिक व नगर -कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गांला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असुन या ठिकाणी वहानांची मोठ्या दररोज प्रमाणावर खरेदी विक्री होत असते.

पंधराच दिवसांपुर्वी या ठिकाणी एक बारा चाकी गाडीने अचानक पणे पेट घेतल्याने जळुन खाक झाली होती ही घटना ताजी असताना सोमवारी रात्री पुन्हा वाहन पेटण्याची घटना घडलेली असुन या परिसरात गेल्या वर्षभरात ५ ते ६ वाहन जळीताच्या दुर्घटना घडल्या असुन या ठिकाणी मोठी बाजार पेठ

,अनेक मोठाले दवाखाने असुन आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असल्याने पुढील काळात शासनामार्फत तातडीने अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.