पुणे : ताणतणाव घालविण्यासाठी कोणताही खेळ हा सर्वोत्तम मार्ग असल्याचा सल्ला डॉक्टर वेळोवेळी देतात. देशातील वैद्यकीय इतिहासात प्रथमच विविध डॉक्टर एकाच शहरात एकत्र येऊन वेगवेगळे खेळ खेळण्याचा अभिनव प्रयोग पुण्यात होत आहे. या स्पर्धा ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
‘यंग डॉक्टर्स लीग’तर्फे (वायडीएल) देशातील एक हजारपेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन केले आहे. या भव्य-दिव्य स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक अशा ११ क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.
‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महिंद्रकर, सचिव डॉ. अमित द्रविड म्हणाले, ‘‘या स्पर्धेतून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्या क्रीडागुणांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. या क्षेत्रातील सौहार्द वाढण्यास मदत होणार आहे. निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैली याचे महत्त्व तसेच याचा प्रसार आणि प्रचार या स्पर्धेच्या निमित्ताने होईल.’’
कुठे खेळणार?
शहरातील वेगवेगळ्या सहा मैदानांवर क्रिकेटचे सामने टेनिस चेंडूवर खेळविण्यात येणार आहेत. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल-बालेवाडी, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, पूना क्लब आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर होणार आहेत.
कोण होणार सहभागी?
ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, दंतवैद्यक असे १५०० डॉक्टर या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, दंतवैद्यक असे १५०० डॉक्टर या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
पुण्याला पहिला मान
पहिल्यांदा होत असलेल्या या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचा पहिलाच मान पुणे शहराला मिळाला आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड,
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू अशा विविध राज्यांतील डॉक्टर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील पुण्यासह मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत, असे डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले.
हे खेळ खेळले जाणार
ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि थ्रो-बॉल हे सांघिक खेळ तसेच बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स्, कॅरम, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, लॉन-टेनिस, पोहणे असे वैयक्तिक क्रीडाप्रकार आहेत, असे ‘वायडीएल’ समितीचे सदस्य डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.