पुणे : पुणे-मुंबई शहराला जोडणारी आणि दख्खनची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली 'डेक्कन क्वीन' शनिवारी (ता. 1) 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या नव्वद वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासात या गाडीने अनेक बदल पाहिले, अनुभवले आहेत. मात्र, तिच्याविषयीची एक गोष्ट आजही कायम आहे, ती म्हणजे तिची लोकप्रियता.
मुंबई-पुणे दरम्यान एक जून 1930 ला 'डेक्कन क्वीन' सुरू झाली. 'ब्ल्यू बर्ड बेबी' नावाने सुरू झालेली ही गाडी नॉन स्टॉप जाणारी पहिली डिलक्स ट्रेन ठरली. दोन इंजिनच्या मदतीने धावणारी, प्रवाशांना आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधा देणारी, सलून व बाथरूम अशा सुविधांसह डायनिंग कारची सुविधा असलेली डेक्कन क्वीन पहिली गाडी ठरली आहे. सात डब्यांसह सुरू झालेली डेक्कन क्वीन सध्या 17 डब्यांची झाली आहे. सुरवातीला प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे डबे होते. त्यामध्ये वेळोवेळी बदल करत सध्या तृतीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. गाडीच्या रंगसंगतीमध्येही वेळोवेळी कालानुरूप बदल झाले आहेत.
देशात पहिल्यांदा रोलर बेरिंगचे डबे, सेल्फ जनरेटिड डब्यांची सुरवात या गाडीपासून झाली आहे. 'आयएसओ 9000' प्रमाणपत्र मिळालेली डेक्कन क्वीन ही पहिली गाडी आहे. या गाडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. गेल्या 90 वर्षांमध्ये या गाडीत अनेक प्रकारचे बदल झाले असले तरी गाडीची प्रवाशांच्या मनावरची मोहिनी आजही कायम आहे.
या गाडीचा प्रवास जवळून पाहणाऱ्या रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, "डेक्कन क्वीनला मी खूप जवळून पाहिले आहे. गेल्या 65 वर्षांपासून या गाडीचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. काळानुरूप डेक्कन क्वीनमध्ये अनेक बदल झाले. गाडीच्या काही जुन्या सुविधा पुन्हा सुरू कराव्यात तसेच तिला सोनेरी रंग दिला जावा.''
''डेक्कन क्वीन ही गाडी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देते. गाडीचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी असल्याने प्रवाशी आनंदी असतात. भारतीय रेल्वेच्या सर्वोत्तम गाड्यांपैकी एक असा या गाडीचा लौकिक आहे.''
- मिलिंद देऊस्कर, विभागीय व्यवस्थापक, पुणे रेल्वे
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.