Hindi Language
Hindi LanguageSakal

हिंदी केवळ साहित्याची नाही, तर उद्योग जगताची भाषा : डॉ. मोरे

Published on

जेजुरी : भारतीय जनमानसाला एकसंध ठेवून स्वातंत्र्याची आंदोलने यशस्वी करण्याचे काम हिंदी भाषेच्या (Hindi Language) माध्यमातून करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. आज हिंदी भाषा देशाच्या सर्व सीमा ओलांडून विदेशात दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे. जगभरातील साठच्यावर देशात हिंदी बोलली जाते. हिंदी केवळ साहित्याची नाही तर उद्योगजगताची, रोजगारनिर्मितीची व प्रसारमाध्यमांची भाषा आहे, असे प्रतिपादन डॉ. जिभाऊ मोरे यांनी केले.

शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या जागतिक हिंदी दिनानिमित्त ‘वैश्विक स्तर पर हिंदी एवं रोजगार के अवसर’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. चीनची लोकसंख्या अधिक असल्याने चिनी भाषा प्रथम क्रमांकावर आहे. इंग्रजी जगभरात बोलली जात असली तरी बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे. भारतात फक्त एक टक्के लोकच इंग्रजी भाषा बोलू शकतात, मात्र, हिंदी साठ कोटी लोक बोलतात व ऐंशी कोटी लोकांना ती समजते. इंग्रजीनंतर जगभरात फक्त हिंदी एवढ्या देशात बोलली जाते. आशिया खंडातील सर्व देशांतील विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर स्तरावर हिंदी भाषा व साहित्य शिकविले जाते. हिंदी साहित्याचा इतिहास लिहिणारे प्रथम विद्वान गार्सा-द-तासी हे फ्रान्सचे होते, असेही त्या या वेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये ज्योती चोरगे, धनश्री कुदळे, हुमेरा पानसरे, गौरी गायकवाड या विद्यार्थिनींनी यश मिळविले. हिंदी विभागप्रमुख डॉ. बेबी कोलते यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन प्रा. संगीता पवार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()