आळे येथील विद्यार्थिंनीना ज्यूदो-कराटे’चे प्रशिक्षण

आळे येथील विद्यार्थिंनीना ज्यूदो-कराटे’चे प्रशिक्षण

Published on

आळेफाटा, ता. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ योजनेमध्ये विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक, मानसिक व भावनिक आदी स्तरावर सक्षम बनविण्यासाठी ज्यूदो-कराटे’चे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात २५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे, महाविद्यालय विकास समितीचे अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, माऊली कुऱ्हाडे, किशोर कुऱ्हाडे, बबनराव सहाणे, गंगाराम गुंजाळ, अरुण हुलवळे, संपत गुंजाळ, राजू कुऱ्हाडे, तुकाराम गाढवे आदी उपस्थित होते.
यावेळी बडगुजर म्हणाले, ‘‘महाविद्यालय विद्यार्थिनींना अत्याचाराविरुद्ध तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी त्यांच्या संरक्षणार्थ जागृती निर्माण करून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.’’
यावेळी सरिता डुंबरे म्हणाल्या, ‘‘आपल्या महाविद्यालयातील उच्च शिक्षण संपादन करणाऱ्या सर्वच मुली ग्रामीण भागातील असून, दररोज पायी, बस व सायकलने महाविद्यालयात ये-जा करतात. मुली आपल्या महाविद्यालयाच्या प्रमुख घटक आणि केंद्रबिंदू असून, मुलींना अत्याचाराविरुद्ध तोंड देण्यास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.’’
सक्षम बनविण्यासाठी ज्यूदो-कराटे’चे प्रत्यक्ष प्रशिक्षण व स्वबचावासाठी काही टिप्स कराटे प्रशिक्षक संजय खंडागळे, आळेफाटा यांनी दिले. तसेच, शिवकन्या भंडागे, सायली कुरकुटे, सुष्टी गागरे, श्रावणी डोंगरे, रूद्रा काळे व वैष्णवी भालेकर या मुलींनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.
या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांचेच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी निखळ, नूतन जोशी व विलास कुऱ्हाडे यांनी केले. या कार्यक्रमास संजय वाकचौरे, डॉ. अरुणा वाघोले, डॉ. केशव बोरकर, डॉ. सविता रहांगडाळे, रावसाहेब गरड, छाया औटी, सोनाली काळे, प्रिया भुजबळ, असिफा शेख आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश भिसे यांनी प्रास्ताविक; तर डॉ. विलास गोर्डे यांनी सूत्रसंचालन केले. नूतन जोशी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()