agriculture and villages
agriculture and villagessakal

मुळशीत 'कृषी पर्यटनास' मोठी संधी ; राजेंद्र मारणे

निसर्गरम्य वातावरण, धरणे, डोंगर, दरी, शेती व गावे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे
Published on

मुळशी तालुका पर्यटनासाठी सर्वांना सोयीचा आहे. येथील निसर्गरम्य वातावरण, धरणे, डोंगर, दरी, शेती व गावे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. आठवडा व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी तालुक्यात होत असते. येथील वातावरणामुळे सहारा, लवासासारखे प्रकल्प झाले. अनेक हॉटेल, लॉज झाली आहेत. पण, येथील शेतकरी, तरुणांच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. पर्यटकांच्या गर्दीचा स्थानिकांना उत्पन्नासाठी अद्याप उपयोग करून घेता आला नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात, गावात कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केल्यास मोठ्या उत्पन्नाची ही नामी संधी आहे. तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग केला असून, त्यांना चांगले यश मिळत आहे. तालुक्यात सध्या अशी दहा ते बारा कृषी पर्यटन केंद्र सुरू असली; तरी मोठे प्रमाण नाही.(Scenic landscapes, dams, mountains, valleys, agriculture and villages attract tourists)

 agriculture and villages
मला कलेक्टर करा; 20 वर्षांच्या मुलीने का दिलं जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान?

शहरातील लोकांना गावाला व निसर्गाच्या कुशीत राहण्यास आवडते. चांगली राहण्याची सोय, स्वच्छता त्यांना आवश्यक असते. पर्यटन केंद्रातून शिवार फेरीचा आनंद त्यांना देण्याची गरज असते. त्यावेळी शेतातील पिके दाखविणे, ट्रॅक्टर फेरी, बैलगाडी स्वारीचा आनंद मिळाल्यास पर्यटक खूष होतात. तसेच, भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात, वांगी, टोमॅटो व इतर भाजीपाला कसा येतो? हे शहरातील नव्या पिढीला माहीत नाही. ते पर्यटन केंद्रामार्फत दाखविण्याची सोय केल्यास पर्यटकांना आवडते. तसेच, त्याची चांगल्या दराने विक्री होऊ शकते. पर्यटक मुक्कामास राहिल्यावर स्थानिक कला, खेळाचे आयोजन केल्यास त्यांच्या मनोरंजनाची सोय होऊ शकते. तसेच, स्थानिक तरुण व कलाकारांनाही उत्पन्न मिळू शकते. तसेच, गाई, जनावरांचा गोठा, दूध कसे काढले जाते, ते पाहण्यास त्यांना आवडते. परिसरातील धरणे, बंधारे, नदी, ओढे, मंदिरे, डोंगर, टेकड्या पर्यटकांचे आकर्षण होऊ शकते.(people of the city love to be surrounded by the village and nature)

 agriculture and villages
'भाजपला एक कोटी मतं द्या, फक्त 50 रुपयांत दारू देऊ'

आजच्या परिस्थितीत अनेकांना, तरुणांना गावाचा आनंद मिळू शकत नाही. शेती कशी केली जाते व त्यातील उत्पन्नाची अनेकांना माहिती नाही. गावाचे गावपण कसे असते, त्यांनी पाहिलेले नाही. त्यांना अशा गावपण व शेतीच्या वातावरणाच्या ठिकाणी राहण्यास निश्चित आवडते. आपल्याच शेतातील भाजीपाला व गावरान पद्धतीने जेवणास ते पसंती देतात. हॉटेलमध्ये खर्च करण्यापेक्षा कृषी पर्यटन केंद्रात राहण्यास त्यांना आवडते. तसेच, स्थानिक फळे, भाजीपाला, घरगुती स्वयंपाकातील कच्चे पदार्थ, मसाले यांची विक्री होऊ शकते.(today's situation, many young people cannot enjoy the village)

 agriculture and villages
पुणे : कालीचरण महाराज आणि मिलींद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणात अशी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यांनी प्रसारासाठी राज्याची मार्ट नावाची संघटना स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तरुण शेतकरींसाठी हा चांगला व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने धोरण आखले पाहिजे. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे. पर्यटन केंद्राची उभारणी, आवश्यक सोयी, पर्यटकांशी वागणे, स्वच्छता, शेतीतील उत्पन्न, मार्केटिंग याचे प्रशिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे. पर्यटन केंद्र उभारणीसाठी बोका, वित्तीय संस्था यांच्याकडून सुटसुटीतपणे कमी व्याज दराने कर्ज मिळाले पाहिजे. तसेच, कर्जाला अनुदान मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक चळवळ सुरू केल्यास त्यांना निश्चित चांगले उत्पन्न मिळेल. अनेकांना तेथे रोजगार मिळेल व बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. प्रत्येक गोष्टीत चांगला दर्जा व आपुलकीची वागणूक गरजेचे असते. व्यवसायात निराश न होता चिकाटी व दम धरल्यास कालांतराने तो निश्चितच बहरतो.

मुळशीत कृषी पर्यटनास मोठी संधी

मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात, गावात कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केल्यास मोठ्या उत्पन्नाची ही नामी संधी आहे. तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग केला असून, त्यांना चांगले यश मिळत आहे.

- राजेंद्र मारणे, भुकूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.