ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका

वडगाव निंबाळकर येथील स्वतंत्र विद्या मंदिर शाळेच्या पाठीमागील बाजूस गेल्या काही महिन्यांपूर्वी निरगिलीची झाडे बेकायदेशीररीत्या ग्रामपंचायतीने तोडली होती.
ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका
sakal
Published on

भुकूम ता. २३ ः मुळशी तालुक्यात ढगाळ वातावरण व तुरळक पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात उन्हाळी भुईमूग, ज्वारी, गहू पिके तसेच भाजी पाल्याची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. शेतकरी पिकांची काढणी करून पावसाळ्यापूर्वी मशागत करत असतात. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काढणीस आलेल्या पिकांवर रोग पडण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. तसेच यावर्षी आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या पाऊस व ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर गळून गेला. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेत लागलेल्या फुलांची गळ झाली. सध्याच्या हवामानामुळे रोग जाऊन फुटांवर डाग पडू शकतात. जांभळीच्या झाडांना फुलोरा आला आहे त्याचीही गळ होऊ शकते.

याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. नुकतेच येथील जिल्हा परिषद शाळा मुलींची संरक्षण भिंत काम करत असताना लिंबाची झाडे काढण्यात आली. झाडे तोडून ती विकल्याचे पुरावे तक्रारीसोबत संबंधित अधिकाऱ्याला दिली आहे. एकीकडे वृक्ष लागवड करा, असा संदेश देऊन दुसरीकडे वृक्षतोड ग्रामपंचायत करीत असल्याचा साळवे यांचा आरोप आहे. याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत सरपंच सुनील ढोले म्हणाले, ‘‘मुलींच्या शाळेची संरक्षण भिंत पुराच्या पाण्यामुळे पडली होती. नव्याने बांधकाम करण्यासाठी सुमारे तीन लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. सदर काम ग्रामपंचायतीमार्फत नीलेश साळवे यांना मजुरीवर करून देण्यासाठी पत्र दिले होते. अडथळा ठरणारे झाड छोटे आहे. याबाबत त्यांना नव्याने या भागात झाडे लावून देण्याच्या सूचना केल्या आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()