भोर, गुणंदपर्यंत बससेवा सुरू करा
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्या आल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
लोणावळा - ‘थर्टी फर्स्ट’च्या (Thirty First) पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्या (Christmas Holiday) आल्याने पर्यटकांची (Tourist) गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळा-खंडाळ्यात नाताळच्या सुट्या, तसेच नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंग, तसेच अनेक सेकंडहोम हाउसफुल (Housefull) झाले असून, बुकिंग सरासरी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत झाले आहे. थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल होतील, अशी आशा आहे.
सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत, नव्या वर्षाच्या स्वागतास पर्यटन नगरी लोणावळा सज्ज होत आहे. लोणावळ्याचे अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी, तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान सेकंड होम बरोबरच बहुतांशी हॉटेल, तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते.
पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती आहे. पर्यटकांचे हॉटेल व रिसॉर्टपेक्षा खासगी बंगल्यांनाच अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.
हॉटेल, रिसॉर्ट सज्ज
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कार्ला येथील एमटीडीसीचे बुकिंग २ जानेवारी पर्यंत पूर्ण झाले, असल्याची माहिती व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी दिली. कोरोना, ओमिक्रोन पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची तपासणी करण्यात येत असून, रूम्सचे सॅनिटायझेशन करण्यात येत असल्याचे हिरवे म्हणाले. पर्यटकांसाठी गझल, लाइव्ह ऑर्केस्ट्रा, कॅम्प फायर, मॅजिक शो, मुलांसाठी खेळ आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नियम मोडल्यास कारवाई - राजेंद्र पाटील
खासगी बंगले, रिसॉर्ट, हॉटेल्स, टेंट कॅम्पिंग चालक मालकांनी नियमानुसार आवश्यक परवानगी घेऊन व्यवसाय करावे, असे आवाहन लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले. नाताळ, नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर, ग्रामीण हद्दीतील हॉटेलचालक-मालक, टेंट व्यावसायिक, खासगी बंगलेधारकांची बैठक घेत, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, याविषयी यांनी सूचना दिल्या. कोविड नियमांचे पालन, येणाऱ्या
पर्यटकांची नोंद, आवश्यक कायदेशीर परवानगी घेण्यात यावी, आदी सूचना पोलिसांच्या वतीने करण्यात आल्या.
ओमिक्रोनची धास्ती
कोरोनाच्या ओमिक्रोन या नवीन व्हेरियंटचा वाढता प्रभाव पाहता, शासनाच्या वतीने नव्याने गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गेले दोन हंगाम फेल गेल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पर्यटकांनी पसंती दिल्याने पर्यटन व्यवसायाची घडी बसत असताना, पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती आणि त्यात पोलिसांची कारवाई अशा दुहेरी कात्रीत सापडल्याने व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.