जर्मनीतील हॅम्बर्गला पुरंदरच्या अंजिराची गोडी
सासवड : पुरंदर तालुक्यात पिकवलेले पूना फिग जातीचे `अंजीर` सुपर फ़िग्ज़ ब्रँडच्या नावाने प्रथमच युरोपियन बाजारपेठेत पोहोचले आहे. हॅम्बर्गमध्ये (जर्मनी) गुणवत्तापूर्ण स्थितीत हे अंजीर पोचविण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याने आता युरोपसह जगाची बाजारपेठ या पुरंदरच्या जीआय मानांकन टॅग केलेल्या अंजिरास खुली झाली आहे. त्याच्या गोडीमुळे तेथील खरेदीदारांच्या पसंतीस ते उतरले आहे.
पणन संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली हा प्रयोग यशस्वी झाला. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने हॅम्बर्ग, जर्मनी येथे असलेल्या पिल्झ शिंडलर (Pilz Schindler GmbH) जीएमबीएचला पाठवलेले चाचणी शिपमेंट यशस्वी झाले. कारण ते तेथे परिपूर्ण व गुणवत्तापूर्ण स्थितीत पोहोचले आहे आणि तेथील खरेदीदारांनी त्याची चव घेतली आणि त्याचे कौतुकही केले.
दोन महिन्यांपासून पॅक हाउसच्या चाचण्या
शेतकरी उत्पादक कंपनीने इस्त्राईलमधील StePac (पॅकेजिंग सोल्यूशन्समधील तज्ज्ञ), कोल्डमॅन लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस आणि जयजिनेंद्र कोल्ड स्टोअर यांच्या सहकार्याने बायर क्रॉप सायन्सच्या फूड चेन विभागासह पॅक हाऊस चाचण्या घेतल्या. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आम्ही स्टेपॅक आणि बायर यांच्या मदतीने बारामतीतील कोल्डमॅन वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक सुविधा आणि वडकी, पुणे येथील जयजिनेंद्र कोल्ड स्टोअरमध्ये गेल्या २ महिन्यांपासून पॅक हाउस चाचण्या घेतल्या, असे रोहन सतीश उरसळ यांनी सांगितले.
यशस्वी पॅक हाऊस चाचणीने आम्हाला आत्मविश्वास दिला. आम्ही आता जगभरातील कोणत्याही बाजारपेठेत पोहोचू शकतो. पिल्झ शिंडलरची भारतीय उपकंपनी असलेल्या scion agricos ने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे असलेल्या मुख्यालयात या अंजीरांची निर्यात करण्यास मदत केली. ही चाचणी शिपमेंट पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी चालना देणारी ठरेल.
- रोहन सतीश उरसळ, अध्यक्ष, पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
यामुळे अंजीर निर्यातीला मिळाले बळ
१. फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ विभागाने जीआय टॅग केलेल्या पुरंदर अंजिराच्या चाचणी शिपमेंटला पाठबळ.
२. सिंगापूरमधील (ता. पुरंदर) मयूर, सौरभ लवांडे यांच्या जीआय टॅग केलेल्या अंजीर बागेमधून अंजीर खरेदी झाली.
३. रामचंद्र खेड़ेकर (उपाध्यक्ष अंजीर उत्पादक संघ), अतुल कडलग, गणेश कोलते, समिल इंगळे, सागर लवांडे, दीपक जगताप, यांच्यासह इतर संचालकांनी या चाचणी प्रकल्पात आणि निर्यात शिपमेंटमध्ये पुढाकार घेतला.
४. स्टेपॅकमधील केतन वाघ यांनी मुख्य कार्यालय इस्रायल येथून पैकिजिंग मटेरिअल मागवले.
५. बायर क्रॉप सायन्सचे चेतन भोट यांनी संपूर्ण प्रकल्पात आवश्यक सहाय्य केले.
६. नवीन फळांच्या निर्यातीसाठी सुनील पवार, पणन संचालक, यांनी पणन विभागाकडून आर्थिक सहाय्य प्रदान.
७. धीरज कुमार, कृषी आयुक्त यांनी प्रकल्पाच्या सुविधेसाठी विविध कृषी विभागांकडून सहकार्य.
१,००० एकर .... पुरंदरमध्ये लागवड ,४,५००० .....टनाचे उत्पादन
पुरंदरचे अंजीर जागतिक स्पर्धा करण्यास सज्ज
पहिल्या प्रयोगात दहा किलो अंजीर निर्यात झाली. या प्रयोगात
विविध हंगामात खत, पाणी, किटकनाशक, फवारणी व काढणी, साठवणूक, तापमान पातळी, सुरक्षितता या तंत्रज्ञानात बदल करून अंजिराची टिकवन क्षमता वाढविण्यात यश आले. भविष्यात स्पेन, टर्की, दक्षिण अमेरिका, अफ्रिकेच्या जागतिक अंजिरासोबत पुरंदरचे अंजीर स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे, असे पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.