कुत्र्याने परतवला बिबट्याचा हल्ला!
बिबट्याची आवडती शिकार कुत्रा आहे. बिबट्याने झडप टाकून कुत्र्याला पकडले. मात्र, कुत्र्यानेही सर्व ताकतीनिशी बिबट्याचा हल्ला परतवून लाऊन स्वतःचा जीव वाचविला.
मंचर : बिबट्याची (Leopard) आवडती शिकार कुत्रा (Dog) आहे. बिबट्याने झडप टाकून कुत्र्याला पकडले. मात्र, कुत्र्यानेही सर्व ताकतीनिशी बिबट्याचा हल्ला परतवून (Repushed) लाऊन स्वतःचा जीव वाचविला (Life Saving) आणि बिबट्याला उसाच्या शेतात पळून जाण्यास भाग पाडले. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे ढेरंगे वस्तीत शुक्रवारी (ता. २४) रात्री उशिरा बिबट्या व कुत्र्यामध्ये झालेला थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
मंचरच्या पश्चिमेला सहा किलोमीटर अंतरावर लांडेवाडी येथील शेतकरी सुनील मारुती शेवाळे यांच्या घराच्या आजूबाजूला उसाची शेती आहे. त्यांचा मुलगा ऋतिक हा उशिरा रात्री घरी आला. त्यावेळी दरवाजाच्या बाहेरच कुत्रे बसले होते. दरवाजा बंद केल्यानंतर थोड्या वेळाने कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्याने घेतलेली झेप दरवाज्यावर पडली. मोठा आवाज झाल्यामुळे ऋतिक याने दरवाजा उघडला.
बिबट्याला पाहून त्याची बोबडी वळली. त्याने ताबडतोब दरवाजा बंद करून खिडकी उघडली. त्यावेळी बिबट्याने बारा ते तेरा फूट कुत्र्याला फरफटत नेले होते. त्यावेळी दुसरे एक कुत्रे जोरात भुंकत होते. कुत्र्याने बिबट्याचा कान, तर बिबट्याने कुत्र्याचा जबडा पकडला होता. जवळपास एक मिनीट थरार सुरु होता. दोघांनीही एकमेकांच्या तावडीतून सुटका करून घेतली.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे घटनास्थळी जाऊन वन कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने ‘ॲनिडेर’ हा कॅमेरा ट्रॅप तेथे लावला आहे. बिबट्या आल्याबरोबर कॅमेऱ्यात कैद होऊन सायरन वाजणार आहे. त्यामुळे नागरिक सतर्क होतील. वनकर्मचारी गस्त घालतील.
- स्मिता राजहंस, वन परिक्षेत्र अधिकारी, मंचर (ता. आंबेगाव)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.