nana nani park close Because of the college youth
nana nani park close Because of the college youth sakal

महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे भोरच्या नाना-नानी पार्कला कुलूप

नाना-नानी पार्कमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा वावर असल्याने पार्कची स्वच्छता धोक्यात आली
Published on

भोर : शहरातील बहुचर्चित नाना-नानी (Nana Nani park)पार्कमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा वावर असल्याने पार्कची स्वच्छता धोक्यात आली आहे. शिवाय तरुण-तरुणींच्या चित्रविचित्र चाळ्यांचा स्थानिकांना आणि रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी (ता. २३) दुपारी पार्कमधील सर्वांना बाहेर काढून पार्कला कुलूप लावले. लॉकडाउननंतर आता शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांत शहर व परिसरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. शहरातील नव्या आळीतील नाना-नानी पार्कमध्ये बसण्याची चांगली सोय आणि उत्तम वातावरण असल्यामुळे त्यांना हक्काची जागा मिळत होती.(nana nani park close Because of the college youth)

nana nani park close Because of the college youth
केतकी माटेगावकरचा संगीत अल्बम लवकरच...

बाग सार्वजनिक असल्यामुळे त्यांना बोलणारेही कोणी नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुले-मुली बागेत वेळ घालवितात असे सुरुवातीला वाटले, परंतु बागेमध्ये चोरीचुपके चाळे सुरू झाले होते. काहींमध्ये वाद होऊन हाणामारीही झाली होती. याची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कारवाईस सुरुवात केली. नगरपालिकेच्या महेंद्र बांदल यांनी कर्मचाऱ्यांसमवेत नाना-नानी पार्कमध्ये सर्वांना बाहेर काढले, आणि पार्कला कुलूप लावले. या बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर म्हणाले की, नाना-नानी पार्कच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात येणार आहे. पार्कसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाणार असून, पार्क उघडण्याची वेळही निश्चित केली जाणार आहे.(Park opening times will fixed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.