शारदा संघातर्फे बचत गटांना कर्ज
वालचंदनगर, ता.२३ : बचत गटातील महिलांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यायाठी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदा महिला संघाच्या माध्यमातून अॅग्रो पणन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाच बचत गटांना १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
बचत गटातील महिलांना उद्योजक बनविण्यासाठी बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे राबवत असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करीत असतात. यासंदर्भात सुनंदा पवार यांनी सांगितले की, गाव तेथे महिला उद्योजक हे अभियान राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. अनेक महिला यामुळे स्वत:च्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत. स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या कला गुणांना वाव मिळत असून कलेनुसार छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकीत आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी मधील वैभव लक्ष्मी महिला बचत गटाला दुग्ध व्यवसाय व शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी २ लाख रुपये, पवारवाडीमधील संकेत महिला बचत गटास दुग्ध व्यवसाय शेळीपालन व शिलाई मशिनसाठी २ लाख रुपये, स्वयंसेविका बचत गट हॉटेल व दुग्धव्यवसायासाठी २ लाख रुपये, जंक्शन मधील एकता बचत गट जंक्शन शेळीपालनासाठी १.५ लाख रुपये,आनंदघन मधील सूर्या महिला बचत गटाला खानावळ, दुग्ध व्यवसाय, शिलाई मशिन, शेवई मशिन, भाजीपाला व्यवसाय ३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी शारदा महिला संघाचे प्रमुख बाळासाहेब नगरे, प्रकाश साळुंके, तात्यासाहेब शेलार, मंदाकिनी घोडके, नीलम जाधव उपस्थित होते.
---
01793
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.