बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकरचा गौरव
चास, ता. १५ : कडूस येथील अकरा वर्षीय बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकर याने अतिकठीण वजीर सुळका अगदी लिलया सर केला. त्याच्या यशाबद्दल राजगुरूनगर (ता. खेड) येथे खेड तालुका शिक्षण विभागाकडून सत्कार करण्यात आला. गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे व विस्तार अधिकारी जिवन कोकणे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राला वरदान लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक गडकोट व पर्वतीय सुळके आहेत. यामध्ये प्रामुख्याने लिंगाणा, अलंग-मदन-कुलंग, वानरलिंगी सुळका, तैलबैला व वजीर सुळका हा नेहमीच पर्यटकांना खुणावतो. वजीर सुळक्याची उंची साधारण २०० फुटाच्या आसपास असून हा समुद्रसपाटीपासून साधारण दोन हजार आठशे फूट उंचीवर आहे. त्याचे भौगोलिक स्थान ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्यालगत आहे. हा सुळका चढाईसाठी काठिण्यपातळीमुळे गिर्यारोहकांना आकर्षित करतो. एस. एल. ॲडव्हेंचरचे लहू उघडे व इतर आठ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीभ्रमर ग्रुप राजगुरुनगर व शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान शिरूर या पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांनी यशस्वीपणे चढाई केली या मध्ये अकरा वर्षीय वरदराजे निंबाळकर होता.
यावेळी विश्वास फ्रेंडशिप ९२ चे प्रवक्ते प्रवीण सुतार म्हणाले, उच्च ध्येय आणि कष्ट करणारेच आयुष्यात यशस्वी होतात, वरद देखील देशासाठी नेतृत्व करेल. याप्रसंगी
अविनाश शिंदे, संजय घुमटकर, सुरेश नाईकरे, दत्तात्रेय बोडरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.