भोरकडे वळताहेत पर्यटकांची पावले

भोरकडे वळताहेत पर्यटकांची पावले

Published on

भोर, ता. ४ ः तालुक्याला निसर्गसौंदर्याचा वारसा लाभलेला असल्यामुळे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटकांची पावले भोरकडे वळतात. तालुक्यातील शांत वातावरण, हिरवेगार डोंगर, घाटांमधील वळणांचा रस्ता, गडकोट किल्ले, मनमोहक पुरातन मंदिरे, धरणांमधील निळसर पाणी, खळखळणाऱ्या नद्या, वाऱ्यांचा घोंगावणारा आवाज, पक्षांचा किलबिलाट, डोंगरातील रानफुले, डेरेदार वृक्ष, स्वच्छ व आल्हाददायक हवा, पाण्यामध्ये व डोंगररांगांमधून होणारे सूर्योदय व सूर्यास्ताचे दर्शन यामुळे अनेक पर्यटक भोरला पसंती देतात. याशिवाय भोर परिसरात खाण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे दरही खिशाला परवडणारे आहेत. त्यामुळे पुण्या-मुंबईतील पर्यटकांबरोबर, पक्षीमित्र, प्राणीमित्र, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी हे एका दिवसाच्या आऊटींगसाठी भोरला येतात.
तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर धरण, नेकलेस पॉइंट, रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले, वरंधा व मांढरदेवी घाट, भोर शहरातील राजवाडा, शनिघाट, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भोरेश्वर व वाघजाई मंदिर, आंबवडेमधील झुलता पूल व नागनाथाचे मंदिर, अंबाडेमधील जानूबाईचे मंदिर आदी पर्यटनक्षेत्रांवर पर्यटक नेहमी असतात. शनिवारी-रविवारी तर तालुक्यातील सर्व रस्ते पर्यटकांच्या गाड्यांनी भरलेले असतात. याशिवाय पुण्या-मुंबईतील अनेकांनी भोरच्या परिसरात जागा व जमिनी खरेदी करून सेकंड होम किंवा फार्म हाऊस बांधले आहेत. तेथे दर शनिवारी-रविवारी ते वास्तव्यास येतात. याखेरीज काही ठिकाणी स्थानिकांनी छोटेखानी हॉटेल्स उभारून जेवणाची व राहण्याची सोयदेखील केलेली आहे.

40404
40405
40408

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()