भोर, ता. ९ः येथील आठवडे बाजारात दुपारनंतर बेशिस्त विक्रेत्यांमुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून आठवडे बाजार रामबाग परिसरातील भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत आहे. नगरपालिका आणि बाजार समितीच्या वतीने विक्रेते आणि खेरदीदारांसाठी सुविधा दिल्या आहेत. परंतु दुपारनंतर बाहेरून आलेल्या व्यावसायिकांनी पार्किंगच्या पुढील प्रवेशव्दाराच्या मुख्य रस्त्यावर दुकाने थाटली. त्यामुळे प्रवेशव्दारावर खरेदीदारांची गर्दी झाली. परिणामी वाहनचालकांना वाहने काढण्यास अडचणी निर्माण झाल्या. खरेदीदारांना ताटकळत बसावे लागले. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांना आतमधील जागेत बसण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सायंकाळपर्यंत एकही पोलिस कर्मचारी किंवा नगरपालिकेचा कर्मचारी बाजाराच्या ठिकाणी फिरकला नाही. केली.
: PNE22S41596
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.