Pune: पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुण्यातील 'या' भागात बेकायदा लॉजिंग अन् देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये वाढ

Pune: पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुण्यातील 'या' भागात बेकायदा लॉजिंग अन् देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये वाढ

Published on

आळंदी, ता. १० : येथील पुणे आळंदी रस्त्यावर दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॅक्झिन भोसरी फाटा ते देहूफाटा परिसरात अनेक बेकायदा लॉजिंग चालविले जात आहे.

तर वडमुखवाडी येथील एका खासगी शाळेच्या आवारात देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या हातवारे करून व्यवसाय करत आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील पदपथावर चालणेही विद्यार्थी तसेच महिलांना मुश्कीलच झाले आहे.

पुणे आळंदी रस्त्यावर मॅक्झिन फाटा, वडमुखवाडीतील शाळेसमोरील भुयारी मार्ग, देहूफाटा, गरूडस्तंभाजवळी लॉज या ठिकाणी हमखास देहविक्री करणाऱ्या महिला दिसून येतात. दुपारनंतर तर संख्या वाढत जाते.

वडमुखवाडीतील खासगी शाळेच्या आवारात, भुयारी मार्गावर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत या महिला राजरोज उभ्या असतात. अवघ्या दिडशे मिटर अंतरावर दिघी पोलिस ठाणे आहे. तरिही वाममार्गाने व्यवसाय केला जातो. याबद्दल स्थानिक नागरिकांना दिघी पोलिसांच्या कार्याबाबत आश्चर्य वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()