जुन्नरमध्ये युद्ध पातळीवर शोध मोहीम

जुन्नरमध्ये युद्ध पातळीवर शोध मोहीम

Published on

आपटाळे, ता १२ : जुन्नर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने कुणबी जातीचे पुरावे तपासण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. जुन्नर तालुक्यात गुरुवार (ता. ९) अखेर २१ हजार ४४४ इतक्या नोंदी आढळून आल्या आहेत.
तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर महसूल विभागात कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी संदर्भात सोमवारपासून (ता. ६)विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
तालुक्यातील आजपर्यंत १८५ महसूली गावांपैकी ११२ महसूली गावांच्या नोंदी तपासून झाल्या आहे. एकूण २ लाख ३२ हजार ७४३ महसूली नोंदी पथकाकडून तपासण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ हजार ४४१ नोंदी या कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या प्रकारच्या आढळून आल्या आहेत. महसूल विभागासोबतच शिक्षण विभाग, वन विभाग, पोलिस विभाग या विभागात देखील नोंदी तपासण्याचे काम सुरू असल्याचे सबनीस यांनी सांगितले.
पथकात महसूल सहायक संतोष कोकणे, तलाठी राजाराम केदारी, प्रमोद इंगळे, शिवाजी जाधव, विशाल उतळे, राजेंद्र अडसरे, वैभव गाढवे, संतोष जोशी, वैभव डोंगरे, मोडी लिपी वाचक चंद्रकांत दुरगुडे, बाळासाहेब साबळे, गौतम डावखर, राजेश कारभळ यांसह कोतवाल व रेकॉर्ड विभागाचे कर्मचारी यांनी नोंदी शोधणे व तपासणी करण्याचे काम केले.
01886

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.