Pune Rain Update
Pune Rain Updatesakal

Pune Dams : पुणे जिल्हा कोरडाच! भाटघर, नीरा-देवघर धरणांत निम्माच पाणीसाठा

भाटघर धरणात २३ टक्के आणि नीरा-देवघर धरणात २७ टक्केच पाणीसाठा
Published on

भोर : जुलै महिना अर्धा संपला तरीही भोर तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी पन्नास टक्के कमी पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. तालुक्यातील भाटघर धरण आणि नीरा-देवघर धरणांमध्येही गेल्या वर्षीपेक्षा निम्माच पाणीसाठा झालेला आहे.

गेल्या वर्षी १४ जुलै रोजी भाटघर धरणात ४२ टक्के तर नीरा-देवघर धरणात ३६ टक्के पाणीसाठा होता. परंतु यावर्षी भाटघर धरणात २३ टक्के आणि नीरा-देवघर धरणात २७ टक्केच पाणीसाठा आहे. भाटघर धरणाची क्षमता ही २३.७४ टीएमसी असून शुक्रवारी (ता.१४) धरणात केवळ ५.८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

Pune Rain Update
Ujani Dam Water Level: उजनीतील पाणी पिण्यासाठीच राखीव! पावसाचा अंदाज घेऊन बॅकवॉटरच्या शेतीच्या पाण्यावर येणार निर्बंध

११.९१ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणात ३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी भाटघर धरणक्षेत्रावर ४४० मिलिमीटर पाऊस पडला होता. परंतु यावर्षी केवळ १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नीरा-देवघर धरण क्षेत्रावर गेल्या वर्षी ८६६ मिमी पाऊस प़डला होता, मात्र यावर्षी ५७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Pune Rain Update
Koyna Dam Update : चिंता वाढली! कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे कमी; धरणात फक्त 'इतकाच' पाणीसाठा

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. खरीपातील पिकांच्या पेरण्या झाल्यानंतर बीयाणे उगवून आले परंतु पावसाने दडी मारली. त्यामुळे भातपीकाची रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली असून सोयाबीन व भुईमूगसारख्या पिकांचेही नुकसान होण्याची भीती आहे.
भोर तालुक्यातील धरणांची स्थिती

भोर तालुक्यातील धरणांची स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.