Baramati police
Baramati policeesakal

Baramati Police: बारामती पोलिसांच्या तत्पपरतेबाबत प्रश्नचिन्ह; अशा घटनांचे पोलिसांना नाही गांभीर्य?

Published on

बारामती: घटना घडल्यानंतर तत्परतेने पोलिसांची कारवाई होणे अपेक्षित असताना बारामतीतील वरिष्ठ पोलिस अधिकारी घरफोडीच्या घटनेकडे दुर्लक्ष करतात, ही बाब दोन दिवसांपूर्वी एका घटनेनंतर अधोरेखित झाली.

बारामती शहरातील सातव चौकातील एका अपार्टमेंटमधील दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही मिळालेले होते. याबाबत पोलिसांना संबंधितांना सांगितल्यानंतर दोन कर्मचारी घटनास्थळी येऊन चौकशी करून निघून गेले.

Baramati police
Sambhaji Nagar: अखेर तिला न्याय मिळाला! मुलासमोर आईवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १४ वर्षे सक्तमजुरी शिक्षा

वास्तविक या घरफोडीसाठी चार जण सशस्त्र आलेले फूटेजमध्ये दिसत आहे. एकाकडे कटावणी व दुसऱ्याच्याही हातात हत्यार दिसत आहे. सुदैवाने या चौघांनी ज्या दोन सदनिकांची कुलूप तोडली, त्यात त्यांना फारसा ऐवज हाती लागला नाही. मात्र, सशस्त्र चोरटे आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनीच येऊन पाहणी केली. ही बाब उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या.

ज्या दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या, त्यात सुदैवाने कोणीही नव्हते. त्यांच्याकडील शस्त्रांचा विचार करता घरात कुणी असते; तर त्याच्या जिवालाही धोका होता. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी तातडीने नाकाबंदी करणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, ही कामे करणे गरजेचे होते.

Baramati police
Buldhana Bus Accident : अपघात टायर फुटल्याने नव्हे तर… ; नागपूर परिवहन विभागाचा अहवाल

प्रत्यक्षात दोन दिवस उलटल्यानंतर या प्रक्रियेला प्रारंभ झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत दिशा ठरविणे गरजेचे होते. मात्र, असे घडले नाही. त्याची नागरिकांत चर्चा आहे.

दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक गुन्हे शोध पथक याबाबत वेगाने माहिती गोळा करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही माहिती घेत आहोत.
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.