baramati
baramati sakal

Pune News : बारामती वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवाद

अवयवदान प्रक्रियेविषयी जनजागृतीची आवश्यकता, अवयव प्रत्यारोपणाचे नियम, कायद्याबाबत माहिती दिली.
Published on

बारामती, ता. १७ : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच अवयवदान परिसंवादाचे आयोजन केले होते.

या वेळी अवयवदान अभियानाच्या समन्वयक अधिकारी डॉ. प्रज्ञा भालेराव, समन्वयक अधीक्षक डॉ. तुषार सावरकर, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका बुनगे, भूलतज्ज्ञ डॉ. अनघा लोंढे उपस्थित होते.

डॉ. लोंढे यांनी अवयवदान, अवयव प्रत्यारोपण, अवयवदानाचे प्रकार, मेंदूची मृतावस्था, ग्रीन कॉरिडॉर आदीबाबत माहिती दिली. डॉ. बुनगे यांनी जिवंतदात्याकडून करण्यात येणारे अवयवदान, मेंदूच्या मृतावस्थेत करण्यात येणारे अवयवदान, अवयवदान व प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या मर्यादेबाबत माहिती दिली.

baramati
Pune News : गृहनिर्माण सोसायटीमध्येही स्थापन होणार तंटामुक्ती समिती : उपनिबंधक संजय राऊत

डॉ. सावरकर यांनी अवयवदानाची गरज, जीवितदाता, जीवित प्रत्यारोपणाचे प्रकार, अवयवदानासाठी पात्रता, क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय समिती व भूमिका, अवयवदान प्रक्रियेविषयी जनजागृतीची आवश्यकता, अवयव प्रत्यारोपणाचे नियम, कायद्याबाबत माहिती दिली.

baramati
Solapur News : रखडलेली कामे मार्गी लावा,गाव सोबत आणतो भाजप आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्याचे आव्हान

डॉ. भालेराव यांनी सादरीकरणाद्वारे अवयवदान व प्रत्यारोपणाची माहिती दिली.
उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, शरिररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली पाटील, सहयोगी प्राध्यापिका डॉ. गीतांजली सुडके, भूलशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. नेहा कांबळे, संध्या नाईक, विनायक साखरे या प्रसंगी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()