Pune News : रखडलेल्या निकालामुळे भावी पीएसआय हवालदील
Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२१ मध्ये घेतलेल्या अराजपत्रित संयुक्त परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षकांच्या मुलाखती २०२४ मध्ये पार पडत आहे. आता जानेवारी २०२३ मधील भरतीची पुन्हा तीच अवस्था होते का? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. कारण नोव्हेंबरमध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा अजूनही निकाल प्रसिद्ध झालेला नाही.
महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची मुख्य परीक्षा पार पडली असून, दोनदा अंतिम उत्तरतालीका जाहिर करण्यात आली आहे. आता जवळपास अडीच महिने उलटू गेले तरीही परीक्षेचा निकाल प्रलंबीत. पीएसआयसाठी अर्ज करणारा सूरज सांगतो, ‘‘मागच्या भरतीत संयुक्त परीक्षेतील इतर सर्व संवर्गाचे निकाल घोषित करण्यात आले.
मात्र पोलिस उपनिरीक्षकांचा (पीएसआय) निकाल सर्वात उशिरा घोषित करण्यात आला. आता तर इतर सर्व संवर्गाचे निकाल झाल्यानंतरच सर्वात शेवटी पीएसआयचे निकाल घोषित करण्याची चर्चा आहे. असे झाले तर आमचा निकाल लागायला २०२५ उजाडेल. आयोगाने दखल घेत पीएसआयचे निकाल वेळेत घोषित करावे.’’ पोलिस उपनिरीक्षकांची जवळपास ३७४ पदे या भरतीत आहे.
उमेदवार म्हणतात...
- मागच्या भरतीतून धडा घेत, आयोगाने पीएसआयचे निकाल वेळेत लावावे
- सर्व संवर्गांच्या निकालानंतर पीएसआयचा निकाल लावू नये, कारण पुढील प्रक्रियेस वेळ लागतो
- निकाल प्रलंबीत राहिल्याने अभ्यासाचे किंवा दुसऱ्या पर्यायाचा विचार करता येत नाही
- आचारसंहीतेत निकाल लांबण्याची भीती उमेदवारांना आहे
२०२३ संयुक्त परीक्षेचा कालक्रम
- २० जानेवारी २०२३ ः जाहिरात प्रसिद्ध
- ३० एप्रिल २०२३ ः पूर्व परीक्षा
- ५ नोव्हेंबर २०२३ ः मुख्य परीक्षा
- २० नोव्हेंबर २०२३ ः प्रथम उत्तरतालीका
- २४ जानेवारी २०२४ ः अंतिम उत्तरतालीका
पदांचे विवरण
संवर्गाचे नाव ः एकूण पदे
- सहाय्यक कक्ष अधिकारी ः ७८
- राज्य कर निरीक्षक ः १५९
- पोलिस उपनिरीक्षक ः ३७४
- दुय्यम निबंधक (वन विभाग) ः ४९
- कर सहाय्यक ः ४६८
- लिपिक व टंकलेखक ः ७०३४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.