गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी

गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी

Published on

बारामती, ता. ५ : ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई, वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.’’ असे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवात महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीजदराप्रमाणेच सवलतीच्या दरात वीजपुरवठा मिळणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही. अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त वीजेचा पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून दिलेले आहेत. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडप, रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.
तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.