मांसाहारी खवय्यांच्या खिशाला दरवाढीची झळ

मांसाहारी खवय्यांच्या खिशाला दरवाढीची झळ

Published on

पळसदेव, ता. ८ : एकीकडे उष्णता वाढलेली असतानाही दुसरीकडे चिकन व माशांच्या दरात वाढ झाल्याने, मांसाहारी खवय्यांच्या खिशाला वाढीव झळ बसू लागली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किरकोळ विक्रेत्यांकडून चिकन तीनशे रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून, माशांच्या दरातही प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या वाढलेली उष्णता, पाण्याची टंचाई यामुळे बहुतांश पोल्ट्री फार्म बंद आहेत. परिणामी बॉयलर कोंबड्यांची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्याने चिकनचे दर वाढले आहेत. सध्या उन्हाळ्यात तीनशे रुपये किलो दराने विकले जात आहे. यामुळे बहुतांश खवय्यांनी चिकनऐवजी मासे खाण्याकडे मोर्चा वळविला आहे.
मात्र उजनीतील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने, मासे मिळण्याचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. यामुळे स्थानिक मासे विक्रेत्यांनी माशांच्या दरात वीस ते तीस रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एरवी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे चिलापी मासे आता शंभरीपार गेले आहेत. मासे व चिकन महाग झाल्याने ढाबा, हाॅटेल व्यावसायिकांची व मासांहाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

सध्या वाढलेली उष्णता, पाण्याची टंचाई, पक्षांची वाढलेली मर यामुळे बहुतांश पोल्ट्री शेड बंदावस्थेत आहेत. परिणामी बॉयलर कोंबड्यांची टंचाई जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने चिकनचे दर वाढलेले आहेत.
- विकास भोसले, बॉयलर कोंबड्यांचे विक्रेते


गावरान कोंबड्या महागल्या
उन्हाळ्यात चिकन व माशांचे दर उतरलेले असतात. याशिवाय गावरान कोंबड्या व अंड्यांना जास्त मागणी नसते. यंदा मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चिकन व माशांचे दर वाढलेले असताना आता गावरान कोंबड्याही महागल्या आहेत. गावरान कोंबडीची चारशे तर कोंबडा पाचशे रुपयांनी विकला जात आहे. यामुळे घर सांभाळत दहा-वीस कोंबड्यांचा खुराडा सांभाळणाऱ्या गृहिणींना उन्हाळ्यातही चांगले पैसे मिळत आहेत.

02379

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.