मंचरला आरोग्य शिबिरात
२३० जणांची तपासणी

मंचरला आरोग्य शिबिरात २३० जणांची तपासणी

Published on

मंचर, ता. ४ : (स्व.) गणपत भीवसेन बाणखेले गणपत बाणखेले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मंचर (ता. आंबेगाव) येथे ढोबीमळा गोकर्णेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या शिबिरात २३० जणांची आरोग्य तपासणी केली. तसेच, रक्तदान शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले.
शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी गणपत बाणखेले यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार डॉ. अमोल कोल्हे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिबिराचे मुख्य संयोजक राजाराम भीवसेन बाणखेले, राजश्री गणपत बाणखेले आदि उपस्थित होते.
भीमाशंकर जनसेवा संघ व गणपत बाणखेले समाज विकास प्रतिष्ठान, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.