आंबेगाव तालुक्यात उद्या शरद पवार यांचा दौरा

आंबेगाव तालुक्यात उद्या शरद पवार यांचा दौरा

Published on

मंचर, ता.१८ :“आंबेगाव-शिरूर विधानसभेतील जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे तांबडेमळा-अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी (ता.२०) सकाळी दहा वाजता येणार आहेत,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
निकम म्हणाले, की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जनतेने दिलेल्या घवघवीत मताधिक्यामुळे पवारसाहेब आभार मानण्यासाठी येणार आहेत. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पवारसाहेब आल्यानंतर काय बोलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.