बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची तीव्र टंचाई

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची तीव्र टंचाई

Published on

मोरगाव, ता.२२ : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाअभावी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे दुष्काळ सदृश परिस्थितीची पाहणी बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी लोणी भापकर, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, जोगवडी, भिलारवाडी या गावांमध्ये केली.
बांदल यांनी भिलारवाडी लोणी भापकर, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, जोगवडी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असलेली पिके यांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
बारामती तालुक्यामध्ये उस क्षेत्र वगळता जवळपास ११००० हेक्टरवर खरीप हंगामामधील बाजरी या मुख्य पिकांसह इतर पिकांच्या पेरण्या होतात. खरीप हंगामामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्याच नाहीत. ज्या काही थोड्याफार प्रमाणामध्ये पेरण्या झाल्या होत्या. तेथील पिकेही पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या शेतकरी पिण्याचे पाणी शेतीचे पाणी जनावरांचा चारा व उपजीविका करताना शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती या अनेक अडचणींमध्ये सापडला आहे. बांदल यांच्या समवेत मोरगाव विभागाचे कृषी पर्यवेक्षक बापूराव लोदाडे उपस्थित होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बारामती तालुक्यात जवळपास ३०,००० शेतकरी सहभागी झाले असून, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात येईल. असे बांदल यांनी सांगितले केले.

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली असली तरी प्रत्येक गावांमधील जलस्रोत कोरड्या अवस्थेत असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून, यातून की केवळ पाऊस हाच एकमेव उपाय असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
...
01599

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.