महाळुंगे येथील विद्यार्थ्यांना
चित्रफीत दाखवण्याचा प्रयत्न

महाळुंगे येथील विद्यार्थ्यांना चित्रफीत दाखवण्याचा प्रयत्न

Published on

महाळुंगे पडवळ, ता. १३ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे बुधवारी (ता. ११) शालेय विद्यार्थ्यांना दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने मोबाईलमध्ये विचित्र चित्रफीत दाखवण्याचा प्रयत्न केला.
महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना टाकेवाडी रस्त्यावर होंडा शाईन दुचाकीवर आलेल्या व हेल्मेट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने मुलांजवळ थांबत त्यांना मोबाईलवर विचित्र चित्रफीत दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलांनी घाबरून तिथून पळ काढला. त्यानंतर दुचाकीवरील व्यक्ती निघून गेला. याबाबत विद्यार्थ्यांनी घरी येऊन पालकांना सांगितले.
याबाबत विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव काळे म्हणाले, ‘‘घडलेली घटना विद्यार्थी व पालकांनी आमच्या कानावर घातली असून, या संदर्भात विद्यार्थ्यांना समूहाने जाणे, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पालकांना किंवा विद्यालयात कळवावे, पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी व शाळा सुटल्यास त्यांना घेऊन जाण्यासाठी यावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com