पुणे
Pune Rain Update : पुरंदरमधील पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा संजय जगताप यांचे आदेश
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील महिनाभरात, तर सध्या तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने व सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
माळशिरस : पुरंदर तालुक्यात मागील महिनाभरापासून अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्वच पिकांच्या, तसेच रस्ते, पूल आदींच्या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईबाबत शासनाकडे अहवाल सादर करण्याचा आदेश आमदार संजय जगताप यांनी शासनाच्या महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.