आशिंपी ग्रामपंचायतीत
१०० टक्के करवसुली

आशिंपी ग्रामपंचायतीत १०० टक्के करवसुली

Published on

महुडे, ता. ४ : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील भोर- महाड मार्गावर असलेल्या उंबर्डे, उंबर्डेवाडी व आशिंपी मिळून असणाऱ्या आशिंपी ग्रामपंचायतीची सन २०२४-२५ चे कर वसुली उद्दिष्ट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १०० टक्के पूर्ण केल्याचे सरपंच प्रकाश किसन उंब्राटकर यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सरपंच उंब्राटकर यांचे उपसरपंच लक्ष्मण येसू उंब्राटकर, ग्रामसेवक अनिल अभंग, ग्रामपंचायत सदस्य यांनी कर वसुलीसाठी योगदान दिले.
आशिंपी ग्रामपंचायत हिरडस मावळातील दुर्गम, डोंगराळ भागातील छोटी ग्रामपंचायत असून, उत्पन्नाचे साधन नाही. तसेच, उंबार्डे, उंबार्डेवाडी व आशिंपी अशा तीन भागात विखुरलेली आहे. या तिन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांनी वेळेत कर जमा केल्याने सरपंच प्रकाश उंब्राटकर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.