नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस

नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस

Published on

नारायणगाव, ता. १० : सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह नारायणगाव परिसरात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याचा वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे हवामानात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाट पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. यावेळी कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या पडून व उन्हाळी बाजरीच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यांत सुरू असलेला प्रचार थंडावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com