पर्यावरण जागर प्रतिष्ठानतर्फे 
वरुडे ग्रामपंचायतीला मानपत्र

पर्यावरण जागर प्रतिष्ठानतर्फे वरुडे ग्रामपंचायतीला मानपत्र

Published on

पाईट, ता. १० ः पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने वरुडे ग्रामपंचायतीस पर्यावरण समतोल राखण्यासाठी केलेल्या योगदानामुळे मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, संचालक मिलिंद शिंदे, बाळासाहेब गवते, सरपंच मारुती थिटे, उपसरपंच अविनाश चौधरी, माजी सरपंच भालचंद्र रोडे, दिलीप चौधरी, एकनाथ वाळुंज, भीमराज मंडले व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
वरुडे ग्रामपंचायतीने मृत व्यक्तीच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता त्याऐवजी सदरच्या अस्थी व रक्षा जमिनीत खड्डे घेऊन त्यात झाडे लावण्याबाबत ठराव करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. संपूर्ण गावाने ही योजना राबविण्याचा संकल्प करून अंमलबजावणी सुरू केल्याने पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामपंचायतीस मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र प्रदान करण्यात आले. सदर मानपत्र मिळाल्याने सर्वत्र वरुडे ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.