गजानन महाराज पालखीची नगरप्रदक्षिणा

गजानन महाराज पालखीची नगरप्रदक्षिणा

Published on

पिंपरी, ता. ५ ः फुलांनी सजविलेला रथ, शेकडो भक्तांची उपस्थिती, टाळ मृदंगाचा ताल आणि सोबत श्रींचा नामघोष करीत चिंचवड तानाजीनगर येथून ‘श्रीं’ची शाही पालखीतून नगर परिक्रमा रविवारी (ता. ५) पूर्ण केली. ठिकठिकाणी श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रींची महाआरती घेउन मंदिरात पालखीची सांगता झाली

श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सवानिमित्त चिंचवडगावातील श्री गजानन सत्संग मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त ‘श्री’ना उष्णोदक अभिषेक आणि अभ्‍यंगस्नान केला. सकाळी सात वाजता कलशपूजन करण्यात आले. दुपारी ३.३० वाजता पालखीमध्ये ‘श्री’चा मुखवटा विराजमान होताच चिंचवडगावातील मंदिरातून प्रस्थान झालेली पालखी झुंजार युवक मंडळाकडे मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्यासोबत बँड पथक, भजनी दिंडी आदी वाद्ये होती. शिस्तबद्ध रांगेत पालखी होती. पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शिवाजी उदय मंडळ - काकडे पार्क -केशवनगर -धनेश्‍वर मंदिर - श्रीं मोरया गोसावी समाधी मंदिर.. सुखकर्ता अपार्टमेंट -गांधीपेठ -चापेकर चौक ते पॉवर हाऊस चौक - बस स्थानक - लिंक रोड - कालिकामाता मंदिर मार्गे निघालेल्या श्री गजानन महाराज मंदिरात सांगता झाली. पालखीचे गजानन महाराज मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणात हा परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.