Bhimashankar Jyotirlinga : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र 'भिमाशंकर' बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
Bhimashankar Jyotirlinga : नमस्कार, मी पुण्यभूमी मोशी येथील महादेव भक्त सागर हिंगणे. लहानपणापासूनच, अगदी आमच्या आजी-आजोबांपासून आम्ही खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात असत. तेव्हापासूनच मनावर महादेव भक्तीचे गारुड झाले. अखंड भारताचे आराध्य दैवत भगवान शंकर महादेवाचे श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या पवित्र ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते. श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या, असे विविध प्रकारचे प्राणी आणि विविध पक्षी आढळतात.
श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. मंदिराच्या सभामंडपाबाहेर पाच मण वजनाची एक सुंदर लोखंडी घंटा आहे. ही घंटा चिमाजीअप्पा पेशवेंनी मंदिराला भेट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.
श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंगाची महती अपरंपार आहे. माझे मार्गदर्शक, आधारस्तंभ भोसरीचे कार्यशील आमदार, पैलवान महेशदादा किसनराव लांडगे आणि त्यांचे लांडगे कुटुंबही भीमाशंकर महादेवाचे निस्सीम भक्त आहेत. ते वेळोवेळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तसेच देवस्थान प्रशासनाला विविध माध्यमांतून सर्वोतोपरी मदत करण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात.
पवित्र श्रावण महिन्यात दर सोमवारी ते विधिवत अभिषेक करून श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग महादेवाची मनोभावे पूजा करतात. श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थानच्या अध्यक्षपदी मा. श्री. सुरेशभाऊ कौदरे विराजमान झाल्यानंतर त्यांनी देवस्थान प्रशासकीय कार्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. रखडलेल्या विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही भाविक भक्ताला त्रास न होता, मनोभावे दर्शन घेता यावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.
विविध उपाययोजना
पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने दररोज हजारो भाविकांची वाढती संख्या पाहून अचूक नियोजन करणे, तसेच ते प्रत्यक्षात आणतात. सुरेशभाऊ आणि त्यांचे सहकारी विश्वस्त मा. मधुकर अण्णा गवांदे व इतर विश्वस्त, तसेच मंदिर व्यवस्थापक मा. चंद्रकांत अण्णा कौदरे, गोरक्ष कौदरे, अंकुश कौदरे,
आत्माराम कौदरे हे इतर सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करतात. कमी वेळात जास्त भाविकांचे दर्शन व्हावे, यासाठी नवनवीन प्रयोग ते करत आहेत. भाविक भक्तांकडून त्या प्रयोगांचे कौतुक केले जात आहे.
भाविकांसाठी शिस्तबद्ध नियोजन
घोडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी श्री. किरण भालेकर साहेब तसेच राजगुरुनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी श्री. राजकुमार केंद्रे साहेब यांच्यासमवेत वेळोवेळी विचार विनिमय करून वाहतूक सुरळीत ठेवणे, येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सुरक्षा, आपत्तीकाळात तत्काळ मदत,
वाहनतळ नियोजन तसेच वाहनतळावरुन भाविकांना मंदिरापर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा प्रकारे नियोजनबद्ध काम अध्यक्ष सुरेशभाऊ व त्यांचे सहकारी करतात. त्यामुळे नक्कीच श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. भविष्यातही अशीच वाढत राहील, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.