Girls
Girlssakal

Pune News : लिंग गुणोत्तरात पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

पुणे जिल्ह्यात मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण चिंताजनक बनले असून जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींमध्ये मुले-मुली लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी ९१२ पेक्षाही कमी आहे.
Published on

इंदापूर - पुणे जिल्ह्यात मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण चिंताजनक बनले असून जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींमध्ये मुले-मुली लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी ९१२ पेक्षाही कमी आहे. यामुळे सदर रेड झोनमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत अंतर्गत गावामधील ० से ६ वर्षामधील मुले व मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये दर हजारी मुलांच्या बरोबर मुलींचे प्रमाण ९१२ पेक्षा कमी असलेल्या रेड झोनमधील ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यासह बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची तालुकास्तरीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेसाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व विषयाशी संबंधित सर्व यंत्रणेच्या उपस्थितीमध्ये दोन्ही कार्यशाळेत बाल लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

Girls
Pune Crime : ऑटो दुरुस्त केल्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मॅकॅनिकला लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र, अद्याप याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झालेला नाही. यामुळे उपक्रमाचे फलित काय झाले हे निष्पन्न झाले नाही. यासाठी ग्रामपंचायत निहाय ग्रामसेवक यांनी सरपंच यांच्याशी चर्चा करून अहवाल बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावेत. सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे अहवाल एकत्रित करीत तालुक्याचा एक अहवाल जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Girls
Pune Crime : टोळक्याने तरुणावर केले कोयत्याने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न

तालुका - ग्रामपंचायत संख्या - रेड झोनमधील संख्या

आंबेगाव - १०४ -४६

जुन्नर - १४४ - ५९

बारामती - ९८ - ३८

इंदापूर - ११५ - ४८

मावळ - १०४ - ५१

मुळशी - ८७ - ३३

खेड - १६२ - ६४

शिरूर - ९५ - ५७

भोर - १५२ - ३९

वेल्हा - ७१ - १९

दौंड - ८० - ४०

हवेली - ७१ - ३७

पुरंदर - ९३ - ४४

एकूण : १३७६ - ५७५

भारत आणि महाराष्ट्र सरकारचे विविध उपक्रम आणि कायदे प्रभावीपणे राबविले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बाल लिंग गुणोत्तर २०११मधील ८८३वरून २०२२मध्ये ९४१ पर्यंत वाढविण्यास मदत झाली आहे. बाल लिंग गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या किंवा बालिका हत्येची कोणतीही प्रथा नाहीशी करण्यासाठी, माता आणि कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येत आहे. चालू वर्षीचा अहवाल आल्यानंतर सद्यःस्थिती लक्षात येईल.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.

जिल्ह्यात दर हजार मुलांमागे किती मुली हे लवकरच स्पष्ट होणार..

जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी लिंग गुणोत्तर प्रत्येक एक हजार मुलांमागे ९४१ मुली आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे ८८३ मुली असल्याची नोंद आहे. जैविक मानकांनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे ९४०-९५० मुली असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील ५७५ गावे रेडझोनमध्ये असून, येथे एक हजार मुलांमागे ९१२ मुली आहेत. बेटी बचाव बेटी पढाव अभियानामुळे यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

सेविका, स्वयंसेवी संस्थांकडून समुपदेशन

रेड झोनमधील गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी योजने’अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांना तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर मोठया प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले. तसेच रेड झोनमध्ये असलेल्या ग्रामपंचायतीवर दर्शनी भागावर फ्लेक्स बोर्डद्वारे प्रसार प्रसिद्ध करण्यात आली. सेविका व स्वयंसेवी संस्था तसेच आशा वर्कर यांच्यामार्फत समुपदेशन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.