अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे आचरण करावे : डॉ. शीतल माने-पवार

अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे आचरण करावे : डॉ. शीतल माने-पवार

Published on

इंदापूर, ता. २ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विचार हे फक्त जयंती, पुण्यतिथी पुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विचार अंगीकार करून त्याप्रमाणे आचरण करावे, असे आवाहन इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. शीतल माने-पवार यांनी केले.

इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शीतल माने-पवार बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी ठरणारे आहे. अण्णाभाऊ यांनी आपल्या कविता, कथा व कादंबरी यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. तरुण पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. वसतिगृहाचे गृहपाल प्रशांत हेळकर यांनी प्रस्ताविक केले; तर विशाल चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार अभिजित वजाळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.