Pune Solapur Toll : पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रवास महागला
इंदापूर : वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १ एप्रिल २०२४ पासून लागू केलेली दरवाढ काही काळासाठी स्थगित केली होती. ती पुन्हा सोमवारपासून (ता. ३) लागू केली आहे.
याचा परिणाम जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस आणि इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी या दोन्ही टोल नाक्यावर झाला आहे. टोलमध्ये वाढ झाल्याने वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्यातील पाटस आणि इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील टोलनाक्यावर एक एप्रिल पासून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केलेल्या सूचनेनुसार टोल दर वाढ लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि मतदान यामुळे ती स्थगित करण्यात आली होती. आता मात्र मतमोजणीच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारपासून ती पुन्हा लागू करण्यात आली आहे.
याबाबत पुणे सोलापूर एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक सतीश चव्हाण म्हणाले, ‘‘टोल रोड प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी टोलचे दर वाढतात. मात्र शासकीय सूचनानुरुप यंदा एक एप्रिल ऐवजी ३ जून पासून टोल दरात वाढ केली आहे.
स्थानिकांच्या मासिक पासमध्ये देखिल सोमवारपासून वाढ झाली असून आता मासिक पास ३४० रुपये होणार आहे. सर्वच स्थानिक वाहन चालकांकडून टोल वसुलीसाठी वरिष्ठ व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. यामुळे स्थानिकांनी मासिक पास घेऊन सहकार्य करावे.’’
सरडेवाडी टोलनाका
वाहनाचा प्रकार, जुने दर वाढीव दर, परतीचे पूर्वीचे दर वाढीव दर,
- कार जीप किंवा हलके मोटार वाहन - ९० - ९५, १३५ - १४०,
- व्यावसायिक हलके वाहन/ मलवाहन, छोटी बस - १४० - १४५, २१५ - २२०,
- बस, ट्रक - २९५ - ३००, ४४० - ४५५,
- अवजड वाहने - ४५५ - ४६५, ६८० - ७००
- अवजड वाहने (सात किंवा त्यापेक्षा अधिक एक्सल) - ५७० - ५८५, ८५५ - ८८०
पाटस टोलनाका
वाहनाचा प्रकार, जुने दर - वाढीव दर, परतीचे पूर्वीचे दर - वाढीव दर,
- कार जीप किंवा हलके मोटार वाहन - ९० - ९०, १३५ - १३५,
- व्यावसायिक हलके वाहन/ मलवाहन, छोटी बस - १४५ - १५०, २१५ - २२०,
- बस, ट्रक - ३०५ - ३१०, ४५५ - ४६५,
- अवजड वाहने - ४७५ - ४८५, ७१० - ७३०
- अवजड वाहने (सात किंवा त्यापेक्षा अधिक एक्सल) - ५८० - ५९०, ८६५ - ८९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.